ओठ आणि काठ
ओठ आणि काठ
तुझ्या ओठांच्या काठावर
आनंद घेत असलेल्या
त्या एकट्या भाताच्या
शितासारखेच माझेही आयुष्य
तुझ्याविना एकट पडलय!
फरक एवढाच आहे
तो आनंद घेतोय आणि मी
तुझ्या आठवणीत रडतोय!
एकतर उष्ट तरी करायचे नव्हते
किंवा
पूर्ण संपवून तरी टाकायचे होते;
माझे आयुष्य!
जेवणाच्या ताटाचे तुझ तू बघ!

