दाट धुकं
दाट धुकं
दाट धुकं
दाट धुकं आज असं
जसं आभाळ फाटलं
निळं निळं रे आकाश
मन उरात दाटलं
गाऊ लागली पाखरं
ओठी वारा हा अबोल
सांगु कशी मी रे तुला
माझ्या मनातील ओल
दव टपोर... पानात
जसं मोती विणलेलं
मन माझं तुझ्यामधी
सख्या ह्दय गुंतलेलं
कशी गोड वाटे अशी
सर उन्हाची चाहूल
आठवता तुझी वाट
होई हळवं... पाऊल
मन माझं भेटीसाठी
सख्या तुझ्या आसुसलं
जसं नदीचं किनारं
दोन व्याकुळ झालेलं
गुज माझ्या काळजाचं
सख्या सांगु तुला कसं
तुझा आठव पडता
मन होई रे ... उदास