तूच माझे पहिले प्रेम
तूच माझे पहिले प्रेम
1 min
15.6K
मी का विसरू तुला ?
तुला विसरणे शक्य नाही
तूच माझे पहिले प्रेम...
तुझं बोलणं,
तुझं वागणं,
तुझं चालणं,
तुझं हसणं
मी कधीच विसरू शकत नाही...
मला विसरायचं नाहीये...
तू जेव्हा कधी
परतून माझ्या आयुष्यात येशील,
तेव्हा या सर्व गोष्टी
मी तुला सांगणार आहे
कदाचित,
या गोष्टी तुला
तेव्हा तरी समजतील...
तू रंगीबेरंगी
सुंदर मोरपीस...
या मोरपीसाचा स्पर्श
ज्या व्यक्तीला झाला,
ती व्यक्ती
स्वतःची राहूच शकत नाही...
तसंच,
अगदी तसंच
तू मला एकदा
स्पर्श केल्यानंतर
मी त्या स्पर्शाला
विसरूच शकत नाही...