मन हे विसावे
मन हे विसावे
1 min
24.5K
कधी कुठे कसे विसावे मन हे उलगडुन कळीत मिटावे
धुंदल्या क्षणी फुलांत सांडावे
अलगद मनाचे कण हे हळवे मीच टिपावे
हलकेच मोहरुन जात असता मन एकांती का रुसावे ?
हाय् हे मन बहरुन कसे उमलताना आज हसावे
मनास उमाळा खास अविरत ते वाहावे
आसवांची मनास घालमेल दाटुन मेघ होवुन आसवे
मन संध्या कधी कातरवेळ प्रियकरात रमावे
उगवती मन हे रविकिरण बरसुनी लख्ख जावे
मन ही कधी काळोख विरहात झुरुनी अंतरंगात एकटेच मिटावे