माझ्या डोळ्यांचा कॅनव्हास
माझ्या डोळ्यांचा कॅनव्हास
माझ्या डोळ्यांचा कॅनव्हास
अता रिता झालाय
काही काळापूर्वीच भरलेला होता तो
त्यात रंग होते
ते अता बेरंग झाले,
सावली होती
अता उजाड माळरान झालंय,
डोळ्यांत आनंदाचा पाऊस होता
अता अगतिकता आहे अश्रू लपविण्याची,
प्रेम होतं
अता आठवण आहे,
पहिला तिच्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता
अता प्रत्येकातून नवा भाव जन्म घेतोय,
पूर्वी वेळ पुरायचा नाही
अता क्षणही सरत नाही,
एवढं सारं घडतंय तिच्या जाण्याने
वेगळीच अवस्था झालीत तिच्या जाण्याने
अता फक्त एकच म्हणावं वाटतं
'हमने तो सिर्फ आपसे दिल ही लगाया था
पर आपने हमारा सबकुछ लूट लिया।