STORYMIRROR

Shekhar Chorghe

Abstract Romance

1  

Shekhar Chorghe

Abstract Romance

भीती

भीती

1 min
3.1K


कोऱ्या कागदावर धाडला भलता निरोप आहे 

तू ही माझीच आहे मी ही तुझाच आहे 

आज या धुंदवेळी मी माझाच नव्हे 

कारण भेटावया मज मधूरात्र येणार आहे 

सरताना ही रात्र आग लागली सार्या जगाभोवती जरी 

मज कसली चिंता मी मात्र मधुरंगात रंगणार आहे 

कशाला हसावे मी कशाला रडावे इथे 

कोणीही मेले जरी मला काय फरक पडणार आहे 

साऱ्या जगात पसरली ही जात माणसांची 

मेले जरी कितीही ती कुठे कमी होणार आहे?

तुझा धर्म वेगळा माझा रंग वेगळा 

धर्मरंग शोधताना माणूस हरवण्याची भीती फार आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract