STORYMIRROR

Deepak Shinde

Abstract Romance

4  

Deepak Shinde

Abstract Romance

तू...

तू...

1 min
488

तू गंध तू बंध तू चंद्र...

तूच प्रतिबिंब आहेस

तुझ्या माझ्यातल्या पावसात

तू नितळ चिंब आहेस


तूच तो हळवा वारा

सांजेचा धुळशार पसारा

मावळतीच्या उन्हामधला

यौवनकुपीतला तू शहारा


धजावणाऱ्या पावलांच्या

खुणांत तुझा सहवास

सागराच्या लाटांवरचा

तू ओथंबलेला श्वास


मी असाच गातो इथे

तुला गीत बनवुनी

तू खुशाल गेली तेव्हा

आसूंत मज भिजवुनी


हे सखये आताशी कुठे

मी अस्ताला निघालो आहे

तू गेली त्याच वाटे मीही

रस्त्याला निघालो आहे


Rate this content
Log in

More marathi poem from Deepak Shinde

Similar marathi poem from Abstract