Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manasi Mhaskar

Abstract

4.5  

Manasi Mhaskar

Abstract

जीवनशाळा

जीवनशाळा

1 min
13.9K


का गं ! तुला आठवते का आपली शाळा ;

तो पांढरा खडू आणि हिरवा काचेचा फळा!

घसरगुंडी खेळताना, यायची खुपच मजा ,

आता तीच चढउतर,वाटते मात्र सजा...

लपंडाव खेळायचो़ आपण मिळून साऱ्या जणी ,

आता मात्र सुखदुखाच्या लपंडावानी, डोळ्यात येते पाणी ...

पाय जमीनी वर टेकत नसताना सुध्धा, जायचा ऊंच झोका , 

आता पाय जमीनी वर च असतात, पण, चुकतो ह्रदया चा ठोका....

इतिहासाच्या तासात आपण, कॅरेकटर  मधे शीरायचो,

भुगोलाच्या तासात मात्र, मनो मन परदेशी फीरुन यायचो....

भाषा मधला कानामाात्रा कधी, समजला च नाही,

संगीता चे औरंगझेब आपण, कधी सुर च जुळला नाही.....

विज्ञान आणी गणित, कधी कळले च नाही,

जीवना च कुठल ही कोड, कधी सोडवता आलेे च नाही....

कुणाला करायचे बाद,आणि कुणाला कस जोडायचे,

हे समजण्या आधी च ,सगळे गणित च विसकटल.....

शाळे चा तो फळा, होता किती बरा,

चुकले असले काही, तर पुसायचो भराभरा....

जीवना तही आपल्या, असा एक फळा हवा होता,

आपण केलेल्या चुकांना , आल असत पुसून टाकता.......


Rate this content
Log in

More marathi poem from Manasi Mhaskar

Similar marathi poem from Abstract