मागणे...!!!
मागणे...!!!


मागणे असे असावे
मागणे तसे असावे
कसे असावे
देवच जाणे...!
मागताना कधीही
देवाकडे असो की
ते माणसांकडे
डोके आपले शांत असावे...!
शांत डोक्यांनी
स्थिर चित्ताने
सद्विवेक बुद्धीने
मागणे मागावे हे सत्य खरे....!!
देव असो वा माणूस असो
वेळ असो वा काळ असो
तथास्तु तथास्तु देव म्हणत असतो
सदैव आपल्या ईच्छा पूर्ण करत असतो..!
गम्मत तुम्हाला सांगावी वाटते
मागण्याची फजिती सांगावी वाटते
म्हणून तर माझी लेखणी झिजते
तुम्हालाही पहा का ते पटते ...!!
देवा परमेश्वरा पुढल्या जन्मी
एवढं मला धन मला दे
की ते मला कधी दुसऱ्याला
>
परत द्यावं लागणार नाही....!
देवांन ऐकलं
त्याच म्हणणं आणि
तथास्तु म्हणाला
पुढच्या जन्मी त्याला भिकारी केला...
एकटा म्हणाला मला
लोक पैसे देऊ देत
आपलं काम करून
काही न मागता निघून जाऊ देत..!
देवांन ऐकलं
त्याच म्हणणं आणि
तथास्तु म्हणाला पुढच्या जन्मी
त्याला सुलभ शौचालयावर बसवलं...!
तिसरा मोठा हुशार होता
त्याने शांत मनाने सद्विवेक बुद्धी वापरली
आणि देवा इतकं धन दे म्हणाला
की देताना कधी कमी पडू नये...!
देव आनंदित झाला
आणि समाधानाने तथास्तु म्हणाला
आणि जाता जाता त्याला
सर्व वैभव आनंदाने देऊन गेला....!