STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

गणित...!

गणित...!

1 min
156

जीवनातले गणित...!

अधिक वजा गुणिले भागीले

कुणी कुणाला   "➕" करतो

कुणी कुणाला  "➖"  करतो

कुणी कुणाला  "❌"  करतो

कुणी कुणाला  "➗"  करतो

पण परमेश्वरच

वेळ आली की  सगळ्यांना " = "  करतो

अधिक वजा गुणिले भागीले

सत्यम वद प्रियं वद...!

अधिक अधिक करून

हाव चाखून पाहीली

वजा थोडे होता

जीवाची घालमेल झाली

गुणाकारचे तत्व आवलंबूनी

गुणोत्तरात वाढ केली

होती ती माया ममता

त्यातून वजा झाली

वजा होता बाकी

शून्यावर स्वारी आली

करून करून भागले

म्हणून शून्यात देव पूजेस लागली

भागता भूत कर्माशी

जाणले जीवन मर्माशी

आठवले मग नर्मदा

अन रामेश्वर मथुरा काशी

शुन्यात विश्व सारे

पहाता मोकळे वाहतात वारे

चला आता म्हणे

सारे परमेश्वर चरणी वहा रे

आनंदी आनंद आता

जीवनी मनसोक्त पहा रे

अधिक गुणाकार वजाबाकी

भागूनी मोठ्या सत्कर्माने जीवन जगारे

जेणे मुक्ती मिळेल याच जन्मी

खूण गाठ मनी ही मनी धरा रे

चार धाम यात्रा परमेश्वराची

मन पवित्र असता कशास हवी रे.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action