STORYMIRROR

Ekanath Rakshe

Action

4  

Ekanath Rakshe

Action

गाडगेबाबांचा मंत्र

गाडगेबाबांचा मंत्र

1 min
27.7K


जेव्हा चालेना कुठलेच यंत्र,

घेऊ गाडगेबाबांचा मंत्र। 

हाता हातात घेऊनि झाडू, 

मिळूनी सर्व रोगराई गाडू। 


दिन दुबळ्यांना घेऊनी संगती, 

घडवू निरोगी विश्वक्रांती। 

समता बंधुभाव जपू शांती, 

भजु सदैव नको विश्रांती। 


शिक्षण आहे उद्याचे धन, 

शिकू अखंड लावूनी मन। 

करुनी थोरामोठ्यांचा सन्मान, 

करू साक्षर अवघे जन। 


दगडाला उगा शेंदूर लावूनी, 

खर्या देवाला नका लाजवू। 

नको नैवेद्य काही दक्षणा, 

द्या रंजल्या गांजल्या भुखी पोटाला। 


आई- बाप कधी का?कोपती, 

देव त्याचीच कि पावती, 

व्यर्थ तिर्थ यात्रा गंगास्नान। 

पुजू माता पितादी ज्ञानमंदिर। 


जीवनी पुर्णता करावे वर्ज, 

दारुपशुबळी सावकारी कर्ज। 

जपाल गाडगेबाबांचा हा मंत्र, 

घरोघरी नांदेल तेव्हा मांगल्य। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action