STORYMIRROR

Latika Choudhary

Action

4  

Latika Choudhary

Action

सूर्य

सूर्य

1 min
26.8K


झोपणार कशी मी?

जागावेच लागेल 

मला या काळरात्रीत

कारण.

ती कधी फसवुन 

चोरून नेईल

माझी गुलाबी.....केशरी

हिरवी पहाट

याचा भरवसा नाही

म्हणून

देते आहे 

पहारा

रात्रीवरच 

झोपू नाही देत कधीच

डोळे ....कान....यांनाही

कारण त्यांना फसवणारी,

लुटणारी टोळी फिरतेय

माणसाच्या मनाच्या

विचारांच्या गावात, गल्लीत, घरात

खोटा चंद्र देऊन

कधी चोरून नेतील

माझा 'सूर्य ' याचा

भरवसा नाही .....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action