STORYMIRROR

Pandit Warade

Action

5.0  

Pandit Warade

Action

ऊठ मर्दा

ऊठ मर्दा

1 min
27.7K


आत अन् बाहेरही पेटलीसे आग रे

तू कसा झोपलासी ऊठ मर्द जाग रे


आठव ते वीर ज्यांनी बायको मुले सोडली 

मायभूच्या रक्षणास्तव प्राणसुद्धा अर्पिले


राजगुरू, सुखदेव, भगतसिंह एकविचारी जाहले

एकदिलाने हसतमुखाने फासावरही लटकले


बांधूनि पाठीस बाळ घोड्यावरती बैसली

फेकला घोडा तटाहून वाघीण जशी चवताळली


झांशीची राणी लक्ष्मी विजेसारखी तळपली

शत्रूच्या रक्ताने तिची तलवार कैशी माखली


यवनांच्या जुलमाने चिडले राजे शिवाजी

साथ देण्या संगतीला येसाजी, बाजी, तानाजी


चार मावळे घेऊनि स्वराज्य तोरण बांधिले

स्वाभिमानी हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापिले


आजही लढती जवान देशाच्या सीमेवरती

सोडूनि घरदार सुखाचे शीर घेऊन तळहाती 


मौजमजा आता जीवाची देशासाठी त्याग रे

चेतवी पुरुषार्थ आतला ऊठ मर्दा जाग रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action