ऩिरोगी पृथ्वी - निरोगी मानव
ऩिरोगी पृथ्वी - निरोगी मानव
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
धरतीवर अामुची माया
उजळली तीची काया ll धृ II
श्रावण येता आनंद झाला
होताच स्पर्श वर्षा राणीचा
परिधान केला शालू हीरवा
लहरत पदरा देते छाया
धरतीवर अामुची माया
उजळली तिची काया II १ ll
होताच दर्शन भास्करा
तेजोमय धरती माता
तूच अन्न वस्र निवारा
तू दानी शूर वीर दाता
धरतीवर आमुची माया
उजळली तीची काया ll २ ll
पदर फाटे तिचा झाडे तोडता
वृक्ष लावा पृथ्वीला सजवा
सुख समृध्दी मानव हिरवा
धरतीची जीवांवर माया
धरतीवर आमुची माया
<
strong>उजळली तीची काया Il ३ ll
पाणी अडवा पाणी जिरवा
श्रमदानाने मिळेल मेवा
एकीने सद् विचार वाढवा
तृप्त करा धरतीला
धरतीवर आमुची माया
उजळली तीची काया II ४ ll
स्व-ईच्छेने प्लँस्टीक सोडा
प्लँस्टीक निर्मिती बंद करा
रोगांचा नाश करा
जीवन निरोगी जागा
धरतीवर आमुची माया
उजळली तीची काया II ५ ll
अन्न मोकळे द्या प्राण्यांना
बंद करा अन्नाच्या कँरीब्यागा
प्रतिबंध करा रोगांचा
आनंदाने सण साजरे करुया
धरतीवर आमुची माया
उजळली तीची काया II ६ ll