रेषांचे गणित....
रेषांचे गणित....
रेषांचे गणित....
तलहातावरील रेषांनोअसतं का भविष्य तुम्हाला?
ललाटीच्या लकीरांनो असतं का नशिब तुम्हाला???
आम्ही मात्र तुमच्या नावावर असतो जगत।
तुमच्या लांबीरूंदीच्या मोजमापात असतो वागत।
आयुष्यरेषा लहानतर कमी आयुष्यमान।
कर्तत्व रेषा मोठी तर मोठा कर्तत्ववान।
पण इथेच चुकते रेषांचे गणित।
या गणितांची चिन्हे वजा आणि अधिक।
गुणाकार भागाकाराने भागेल काय?
जो तो आपल्या रेषानुसार वागेल काय?
आम्ही मात्र या मापदंडात पडलो अडकुन
भविष्य पहाणार्याच्या फशीला पडलो सडकुन
आमचे भविष्य पोपटाच्या हाती।
कार्ड दाखवुन तो मारेल माथी।
जर बोलता आले असते या रेषांना।
त्यानीच दिले असते उत्तर या सर्व प्रश्नांना।
असते भविष्य स्वतःच्या कर्तत्वात।
हेच दाखवले असते उत्तरात
पण या गणितातही आहे समिकरण।
म्हणतात ना......नको करूस हात दाखवुन आवलक्षण.........