STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

5.0  

Raosaheb Jadhav

Inspirational

रोग

रोग

1 min
820


रोग...


साल येते साल जाते

साल सुकते झाडाची

सालोसाल खंगणाऱ्या

व्यथा बधीर बुडाची...


आभाळात दूर जातो

कधी फाटणारा ढग

मायमातीच्या नशिबी

सारे गरतीचे भोग...


सोससोसताना कधी

आभाळाचा पुसे टिळा

नशिबाला नांगरून

पुन्हा पिकवते मळा...


भीती तरी उरी पोटी

उर फुटतो मातीचा

हुसासत्या कोंबालाही

रोग जडतो साथीचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational