STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Inspirational

5  

Raosaheb Jadhav

Inspirational

ती किंवा बी...

ती किंवा बी...

1 min
264

बी किंवा ती...


वाटलेही नव्हते तिला

की कोसळेल तो

गरपीटीसह असा अवकाळी

आणि लागतील अंकुरू 

गर्भात जपलेली बीजांडे

गाणे गुणगुणताना पावसाचे

सूर गवसण्याआधीच...


उन्हाळा पुरता सरला नसतानाही

ती लागली झेलू 

अंगावरून निथळणाऱ्या थेंबांना

अल्लड ओल्या कल्पनेने तळहातावर


खरे तर आताशी कुठे शिवू पाहतोय तिला

अल्लड कावळा नीटसा 

आणि अनुभवा पलिकडे आहे अजून

अंकूर करपण्याच्या दुःखद अनुभवाचा

उन्हाळ चटका...

तरीही ती करू पाहतेय समर्थन

आपल्या समजदारपणाचे

धडकत्या काळजातली श्वासकाहिली

थंडावल्याचे

पाणीप्रश्न सुटल्याच्या अविर्भावात


पण तिला कुठे माहीत आहे 

की 'एल निनो'च्या उसळ्या 

ठरणार आहेत प्रभावी

उद्याच्या नियमित पडणाऱ्या पावसावर

आणि तोवर तिला पुरवावे लागणार आहे

स्वत्व गर्भातले अंकुरल्या बियांना

करपेपर्यंत 

बी किंवा ती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational