Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shanti Gurav

Inspirational

3  

Shanti Gurav

Inspirational

स्त्री शक्ती चा जागर

स्त्री शक्ती चा जागर

1 min
137


अनादी काळापासून स्त्रीचे होते एकच भावविश्व

चूल व मूल सांभाळत जगणे एवढेच होते तिचे अस्तित्व


एका बंदिस्त चौकटीत राहण्याची होती लक्ष्मणरेषा

उंबरठा ओलांडणे, अभिव्यक्त होणे ही अप्राप्य आशा


मग स्त्रीच्या दबक्या हुंदक्यांचे शब्दरूप बनले फुले, आगरकर

हळूहळू स्त्रियांनाच बसू लागला विश्वास स्वशक्तीवर


स्त्रीवेदना, संवेदना प्रकटल्या शांताबाईंच्या काव्यात

स्त्रीशिक्षणाची मशाल धरली सावित्रीबाईंनी हातात


तळपू लागल्या आसमंती राणी लक्ष्मीबाई, अहिल्या, जिजाबाई

वैद्यकीय क्षेत्रात आनंदी तर न्यायदानात अव्वल ठरल्या रमाबाई


उत्तुंग एव्हरेस्ट ही बचेंद्री, कृष्णा, अरूनिमाने केला सर

कल्पना चावला बनली पहिली स्त्री अंतराळवीर


सुवर्ण कन्या पी. टी उषा, मेरी कोम, अंजलीने गाजवले मैदान

सर्वच क्षेत्रात स्त्रीशक्तीने घातले धुमशान


कालची अबला नारी, आजची तलवार हाती घेतलेली नारायणी

घेतली उत्तुंग भरारी, लखलखती जणू जिवंत सौदामिनी


वेचले तिने वाटेतले काटे हिमतीने , केली दूर स्वतःची अगतिकता

आत्मसन्मानाची मशाल घेऊन, नेले पाऊल पुढे,दाखवली निर्भिडता


तीच अन्नपूर्णा, लक्ष्मी, नवदुर्गा, तीच महिषसुरमर्दिनी

आता तरी जीवनाची सर्व सुखे, मान, आदर अर्पू तिच्या चरणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational