STORYMIRROR

Shanti Gurav

Romance

3  

Shanti Gurav

Romance

होशील का माझी?

होशील का माझी?

1 min
195

तुझ्या डोळ्यातले प्रेमळ भाव

चुकवतात माझ्या हृदयाचा ठाव.


तुझ्या गुलाबी ओठांची हालचाल

माझ्या हृदयाला करतात घायाळ.


वाऱ्यावर उडणारे तुझे केस रेशमी

उठवतात मनात भावनांच्या उर्मी.


बोलणे तुझे मृदु ,मधुर

नेतात मला कल्पनेच्या जगात दूरदूर.


खळखळणारे निरागस तुझे हसणे

छेडतात माझ्या हृदयाचे तराणे.


जणू असतेस नेहमीच माझ्या आसपास

तुझ्या अस्तित्वाचा होत असतो सतत आभास.


हा भास तू खरा करशील का?

माझे हृदय कायमचे सांभाळशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance