STORYMIRROR

Shanti Gurav

Classics

3  

Shanti Gurav

Classics

प्रवास मनाचा

प्रवास मनाचा

1 min
198

मधेच कधीतरी मन मागे जाते

चिंचा, बोरांनी लगडलेल्या वृक्ष फांदीवर जाऊन बसते

वरून पडणारी आंबट, गोड फळे अलगद झेलते

गोड, मधुर तृप्तीचा आस्वाद घेते


  मधेच कधीतरी मन मागे जाते

  हुतूतू, लपंडाव, लगोरीत मस्त रमते

  आंधळी कोशिंबीरीत मज्जाच करते

  खो देण्याच्या नादात कुठेतरी धडपडते


मधेच कधीतरी मन मागे जाते

वर्गातल्या सख्यांशेजारी जाऊन बसते

आपसातली कुजबुज ऐकून खुदकन हसते

त्यांच्या संगतीत जगालाच विसरते


   मधेच कधीतरी मन मागे जाते

   बरणीतले लोणचे, डब्यातले लाडू शोधते

   आईच्या धपाटयांनी पाठ चांगलीच शेकते

   रात्री त्याच हातांनी अलगद थोपटल्यावर झोपते


मधेच कधीतरी मन मागे जाते

भातुकलीच्या खेळात रमून जाते

आजीच्या गोष्टीतली राजकुमारी बनते

बाबांचा हात धरून जत्रेत फिरून येते


   मधेच कधीतरी मन मागे जाते

   चिंता, दुःख विसरून स्वच्छंदपणे विहरू लागते

   कधी नदीकाठी स्थिरावते, कधी झाडाखाली विसावते

   मनच ते तिथेच घुटमळत राहते


मधेच कधीतरी मन असेच मागे जाते, शांत होते बालपणीच्या आठवणींनी बरेच सुखावते         

 मग नवीन ऊर्जेने जीवनाच्या वास्तवाशी जोडून घेते

असेच मनाचे प्रवास गाडे चालत राहते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics