तिचे मानांकन
तिचे मानांकन
अस्मिता आणि अस्तित्व याचे
समीकरण म्हणजेच एक मानांकन
समाजात आदराचं स्थान मिळवता मिळवता
नीती, अनीतीने भेटलेली कित्येक शब्दरूपी ही मानांकन
जन्माला येताच तू, हंबरडा फोडून
कार्टी नावाचं मिळालं तुल पहिलं मानांकन
किशोरावस्थेत तुझे उमलते शरीर
बनते एक अवैचारिक मानांकन
तारुण्यावस्थेत प्रवेश करताना
देहाच्या भांडवलाचे केलं जाते ते मानांकन
स्त्री क्षणाची पत्नी बनते तेव्हा
मिळते ते गृहिणी म्हणून मानांकन
पुढे जाऊन ती आई बनते आणि
मातृत्वाचा शिरपेचाच होत एक मानांकन
वीस ते चाळीशीच्या कालावधीत
तीला हक्काचे मिळाले श्रमकरीचे मानांकन
याचवेळेला तिने पटकावले अत्याचार सहन करताना
अजून एक उपभोगवादी नावाचं मानांकन
पुराणातील तिचे सती जाणे आणि
आता जळून मरणे हेही एक निर्भया म्हणून मानांकन
रूढी आणि परंपरांचा त्याग करताना
तिने दर्शविले परमप्रीतीचे मानांकन
कागदावरच फक्त तू माझा श्वास आणि ध्यास
आणि लेखणीतले प्रेरणास्थान हेही एक मानांकन
आयुष्याच्या सरत्या क्षणाकडे झुकताना
सुजनशीलतेचे मिळाले एक प्रतिव्रता म्हणून मानांकन
समाजसेवेचे कार्य करता करता
कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचं भेटले एक मानांकन
अधूनमधून भरकटलेल्या तरुणाईमुळे
घ्यावे लागले नको ते असंकृतीचे मानांकन
वासनेने बरबटलेल्या चेहऱ्यांना तोड देताना
मिळवलं एक भोगवस्तू नावाचं मानांकन
आर्थिक परिस्थिती जर नाजूक असेल
तर अलगद मिळते ते परावलंबी म्हणून मानांकन
श्रीमंताच्या घरात आयुष्य उपभोगत असेल तर
मिळते फुकटचे अभिमानी असल्याचे मानांकन
आजकाल प्रत्येक साहित्य कादंबरीत तिचे
हिरावून घेतलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मानांकन
परंतु या सर्व निश्चित अवस्थेतून जात असताना
का नाही मिळत तिला एक स्त्री असल्याचे मानांकन ?
