STORYMIRROR

BABAJI HULE

Others

3  

BABAJI HULE

Others

शब्द आले सोबतीला

शब्द आले सोबतीला

1 min
344

कोरोनाच्या काळातच 

माझ्यातल्या मी शोधला 

अक्षरांच्या ओळखीत 

हरवलो मी स्वतःला 

 

लेखणीत पाहीले मी 

झाली ओळख शब्दांची 

देवाणघेवाण केली 

मिळवणी अक्षरांची 

 

जुळवाजुळव केली 

वाक्य शब्दांनी बनली 

अर्थ निघत ते गेले 

यमकही जुळवली 

 

हळूहळू वाढे साठा 

शब्द आणि अक्षरांचा 

मिळे सुदंर विषय 

लिहिण्याला कवितांचा 

 

हितगुज केले मीच 

साथ स्वतःची मिळाली 

केली सोबत शब्दांनी 

काव्यांतल्या रचनेने 

 

रममाण झालो आता 

पान लेखणी रंगली 

माझ्यातला कवित्वाला 

साद मनानी घातली 


Rate this content
Log in