विरोधाभास ?
विरोधाभास ?


पंढरीच्या वारीला कोरोनाचा फास
विठ्ठलाच्या भेटीची लागली मला आस
राज्यकर्त्यांचा मात्र वेगळाच अट्टाहास
मार्केटची गर्दी चालते पण नियमांचा हव्यास
पायी वारीला नकार ---- किती हा विरोधाभास ?
निवडणुकीच्या प्रचाराला मुभा आणि होकार
तर धार्मिक कार्यक्रमांना बंदी आणि नकार
सरकारी नोकरांना लोकल ची संधी
तर खाजगी लोकांना प्रवासाला बंदी
कर हवाय पण कार्यालये बंद----किती हा विरोधाभास ?
नक्की कोरोनाचं ठरलय तरी काय
माणसाची कोणती वर्गवारी निष्प्रभ ठरतेय
शिक्षण हवे ऑनलाईन पण परीक्षाच नको
नोकऱ्या हव्यात पण
कष्टदायक नको
बेकारीची कुऱ्हाड डोक्यावर ---- किती हा विरोधाभास ?
लाखो कोटींची पॅकेज कागदावरच पण धंदा मात्र तुम्ही करा
प्रत्यक्षात घोषणांचा बोजवारा कागदावरच दिसतो बरा
आरोग्यव्यवस्थेची कुचकामी यंत्रणा जनतेच्या माथ्यावर
जीवघेण्या कोरोनातही सर्वांचे प्रेम मात्र एकमेकांच्या पथ्यावर
लुटणारी आणि लुटून घेणारी जनताच ------ किती हा विरोधाभास ?
महामारीने होरपळलेल् जग सुद्धा शिताफीने सावरताय
आपल्याच देशात आपले राज्यकर्ते मात्र आपल्यालाच लुटताय
महामारीतही संधी शोधतायेत आमचे नेते मंडळी
खुर्ची मिळवण्यासाठी जनतेलाच करतायेत आंधळी
आपलीच निवड चुकीची --- म्हणूनच हा एक विरोधाभास ----