STORYMIRROR

BABAJI HULE

Thriller

3  

BABAJI HULE

Thriller

कोसळधार-१९८४

कोसळधार-१९८४

1 min
149

आला आला पावसाळा 

महिना होता श्रावणाचा

सरी वर सरी जोर करी

दिवस होता तो स्वातंत्र्याचा

 

वर्षे एकोणीशे चौऱ्याशीचा

अनुभव छत्तीस वर्षपूर्वीचा

पंधरा ऑगष्ट होता तो 

दिवस मुसळधार पावसाचा

 

संतत धार चालू होती

तोडत होतो फरस बी शेतात

तीन वेळा कपडे बदलली

पण अंगाला गार झोबत होत

 

नदीला आला होता महापूर 

झाले पाणीच पाणी सगळीकडे

कधी नव्हते ते गावात शिरलेले

दुथडी भरून वाहत होते नाले ओढे 

 

दर्शन होत होत समुद्राचं

नदीच्या रूपात आणि आजूबाजूला

नेली सारी पोतडी डोक्यावरो 

ओढ्याच्या पुरातून जवळच्या हुंडेकरीला

 

नाही विसरणार कधी हा पाऊस

ज्याने दाखवला सागर शेतात

दोन दिवसांनी पट्टी आली

फरस बी ची लय जोरात

 

मुसळधार पाऊस गावाचा 

अनुभव मोठा मोलाचा

ज्यात पहिली कोसळधार

आणि आनंद महापुराचा  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller