कारण इथं....
कारण इथं....
ठेवा ते मन मनोगत आपुलं गुप्त
भले भले मनोरे सारे कोसळलेत
कारण इथं भिंतीलाही रे कान आहे....
बोंबीच्या देठापासून नका किंकाळू
तोंड आपुले नुसतेच नका ते जाळू
कारण इथं समाज बहिरा पण आहे...
जातीधर्माचे दिवे सदाच लावलेले
बुवा बाबानी सेंदूर सदा फासलेले
कारण इथं धर्मांधांची ती खाणआहे...
शुद्र-अशुद्र, वंशीय दंगे सदा पेटलेले
प्रेतांचे थर, रक्त पाट सदा वाहिलेले
कारण इथं स्वस्त ते मरण आहे..
मूठभरांच्या मूठी भरलेल्या फक्त
हजारोंचे हात आहेत ओस, रिक्त
कारण इथं अर्थसमानता घृण आहे....
त्यांचेच सरकार, तेच नित्य राजे
आम्ही ऊचलतो अविरत ओझे
कारण इथं खाणी राजकारण आहे.....
जिथं तिथं तोडा फोडा राजनिती
धनिक लाड नं श्रमिक हाळ किती
कारण इथं ब्रिटीश पगडा गहण आहे..