माणूस विसरला नाते माणुसकीचे
माणूस विसरला नाते माणुसकीचे
मानवाने विसरली माणुसकी
तो शिकार करू लागला मुक्या जनावरांची.
आदिमानव मानत होता निसर्गालाच देव
धूर्त मानवा आतातरी संस्कृतीची जाणीव ठेव.
मानवाने केली जंगलतोड
ओझोनचा थर झाला कमी तरीही त्याची मोडली नाही खोड.
निसर्ग पुरवत होता सर्व मानवी अपेक्षा
निसर्गाच्या स्वाभिमानाला मानवाने केली शिक्षा.
मानवाने पोहोचविली पक्षी आणि प्राण्यांना जिवीतहानी
म्हणूनच हंता, कोरोनासारखे आजार पडू लागले कानी.
तंत्रज्ञानी मानव ठेवू लागला स्टेटस हत्ती अपघाताचे
खरंच माणूस विसरला नाते माणुसकीचे...