विठ्ठला
विठ्ठला
1 min
257
आषाढीस लागती तुझ्या भेटीची ओढ
म्हणूनच रानावनातली भाकरी लागती गोड
सूर पडता कानी टाळ-चिपळ्यांचा
सर्वांनाच अभिमान वाटतो महाराष्ट्राचा
ओठांवरती सतत नाम तुझे
वारीमध्ये पाहण्यास मिळेल रूप तुझे
रूप पाहता तुझे
बेभान होतात सारे
विठ्ठला करत नाही तू भेदभाव
तुझ्या वारीमध्ये नसतो कोणी साव
देतो सतत सावली मायेची
विठ्ठला तुच झाला संकटकाळी माऊली सर्वांची
तुझ्यात चंद्रभागेत लोक धुतात आपल्या कर्माचे पाप
विठ्ठला तूच सर्वांचा माय आणि तूच बाप