बरसू लागले थेंब पावसाचे
बरसू लागले थेंब पावसाचे
विजावाऱ्याचे चालू लागले खेळ
आता नक्षत्रांचा ही लागत नव्हता ताळमेळ
मेघराज करू लागला गरीबांची मस्करी
कष्टकऱ्यांनाही गोड लागेना आता मीठ-भाकरी
बरसू लागले थेंब पावसाचे
चिज झाले शेतकऱ्यांच्या कष्टाचे
ओला वारा काया करत होता गार
आनंदाने बघू लागली रानावनातून ही खार
मन झाले बेभान
विसरून सारे दुःख, न राहिले कशाचेच भान
नभांनी ऐकली कष्टकऱ्यांची गाणी
सुसाट वारा घेऊन आला पाऊस-पाणी
बरसू लागले थेंब पावसाचे
चीज झाली शेतकऱ्यांच्या कष्टाचे