असूनही छत्री, भिजलो का मी?
असूनही छत्री, भिजलो का मी?
असूनही छत्री
भिजलो का मी?
पावसातच शोधतो
तिझ्यातला मी
आयुष्याच्या तारूण्यात
अचानक भेटलेली ती
मागच्या बाकावर बसून
पाहणारी ती
ढगांची गर्जना सांगायच्या
असंख्या आठवणी
पाहता डोळ्यात
आठवल्या आठवणी
विजांचा कडकडात
आठवती भांडण
अश्रूंसवे विसरूनी
पावसात भांडण
मंद वार्याची लहर
अंगावरील कटेरे शहारे
फुलवत होते जखमा
अंगावरील शहारे
पावसाचा प्रत्येक थेंब
एक एक आठवण होती
जेव्हा प्रेमात ती
माझी होती
अजूनही माहीत नाही
तेच का प्रेम?
आज नकळत कळलं
हेच बावरे प्रेम
पावसात पाहता तिला
मनसोक्त हसत होतो
जखमांवर पांघरूण घालून
सर्वकाही विसरत होतो
असूनही छत्री
भिजलो का मी?
आयुष्याच्या वळणावर
रडत होतो ती आणि मी