सुसाट सुटला वादळ वारा
सुसाट सुटला वादळ वारा
सुसाट सुटला वादळ वारा
ओल्याचिंब करू लागल्या पावसाच्या धारा
कडक ऊन पडत होते भल्या दुपारी
पावसाच्या आशेनेच भरू लागल्या कडेकपारी
तुझीच वाट पाहत होती झाड आणि वेली
खाली न पडताच मेघा डोईवरून गेली
विजांनी केला सावधतेचा इशारा
सुसाट सुटला वादळ वारा
नदी-नाले सर्व झरे आटले
आता शेतकरी राजालाही घनावळीचे खेळ नाही पटले
आता निरागस, भकास झाली शेती
नाइलाजाने काळी आई सावरू लागली आपली माती
फुला-पानांनो आता थोडासाच धीर धरा
सुसाट सुटला वादळ वारा
सुसाट सुटला वादळ वारा
ओल्याचिंब करू लागल्या पावसाच्या धारा