पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी
रूढी परंपरा मोडली सतीची
रयतेला मिळू लागली सावली मायेची.
मल्हाररावांकडून शिकत होत्या गनिमी कावा
म्हणूनच पडत होते आक्रमणाचा अचूक डाव.
परकीय गनीम एक-एक कोस करून घेत होते स्वाधीन
पण फितुरांनाही धडा शिकवत शिकवू लागलेली आता ही वाघीण.
एका स्त्रीचा पाहून पराक्रम
शत्रू घाबरत होते करायला आक्रमण.
अहिल्याबाईंचे पाहून वार
शत्रूही होत होते गार.
अफाट केली होती श्रद्धा आणि भक्ती
म्हणूनच प्रकट झाली होती महाशक्ती.
बांधले मंदिर का
शी विश्वेश्वराचे
विचार जागवत होत्या मनी शिवरायांचे.
मराठी माणसाचे राज्य येऊ लागलेले संपुष्टात
पण अहिल्याबाईंनीच दाखवलेली शत्रूंना परतीची वाट.
रयतेला मिळू लागलेला खरा न्याय
खरच आता राहिले नव्हते पारतंत्राचे भय.
समाजामध्ये स्त्रीच्या रुपाने निर्माण केला आदर्श
म्हणूनच आजही गरज भासू लागते प्रत्येकाला त्यांच्या विचारांचे मार्गदर्श.
हिंदुस्तानाचे युद्ध गाजवून गेली
स्वराज्य निर्माण करून गेली
अशी एक महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर होऊन गेली...