परीक्षा
परीक्षा
तू दूर असताना
तुझा विचारच करत नाही कोणी उठता-बसताना
नको-नकोशी वाटते तू सर्वांना
पण खरंच तुझीच गरज आहे ह्या मानवांना
वर्षातून तू वेगवेगळ्या रूपात येते
काहीजणांना दुःख तर काहींना आनंद लगेचच देऊन जाते
तू गेल्यावर दुर्लक्ष करतात सारे
म्हणूनच आत्मपरीक्षणामध्ये लोक हारे
तू नसताना सर्वच असतात निवांत
खरच तुझ्यामुळेच कळतात कोण आहे गुणवंत
वर्षाच्या अखेरीस पुन्हा तू येते
आता तर तू झोपलेल्यांची झोप उडवते
काही काळ रात्र-रात्रभर जागवते
खरतर दररोजच तू वेगळ्या रूपात उभी असते
सर्व जण लिहितात तुझ्यावरती समीक्षा
गरज आहे तुझी कारण तूच शिकवते आत्मपरीक्षा