निखळ मैत्री
निखळ मैत्री
हे विश्व सारं दुनियादारीचं.
त्यात प्रेमळ नातं निखळ मैत्रीचं.
आयुष्याच्या वळणावरती अचानकच समोर आली.
ऐका स्मितहास्याने कळलच नाही मैत्री कशी झाली.
हळूहळू ओळख पटली.
ह्रदयातूनी चर्चा सुरू झाली.
ह्रदयाचा ठोका वाढला.
शब्दांऐवजी ह्रृदयाचाच आवाज आला.
बोलायचं तर होतं मनातलं खूप काही.
असेच विचारात सारे क्षण क्षणात निघून जाई.
एक चेहरा, एक स्मितहास्य.
कळत नव्हतं हे मैत्रीचं निखळ रहस्य.
तिचाही होता मनाला भूरळ पाडणारा लाजाळू स्वभाव.
गप्पांमध्येच कधीकाळी कळले तिचे नाव-गाव.
नव्हती लाली, पण
खळी पडायची गालावर.
रूप तिचं नक्षत्रासारखं रूजलेलं मनावर.
रंगल्या गप्पा रात्रंदिन भ्रमणध्वनीवर.
समोर न बोली ते बोली प्रत्येक क्षणांवर.
तिची अनोखी निखळ मैत्री.
तिच्या मैत्रीबद्दल मनाला झालती खात्री.
आयुष्याच्या वाटेवर भेटलेलं हे अप्रतिम नातं.
तिच्याच नादात वेड मन कोणतंही गाणं गुणगुणतं.
समजू लागली ती अबोली भाषा नयनांची.
खरच निखळ मैत्री हि मिलन दोन जिवांची.
नसताना ती सतत व्हायचा भास.
तिच्या उशीराने तिला पाहण्यासाठी लागायची आस.
झालती माझ्यासाठी ती खूप खास.
स्वप्नातही आता तिचा जाणवतो आभास.