पहिला पाऊस
पहिला पाऊस


हिरव्यागार पावसाची
ती अल्लड सर.
डोळ्यांत काही शोधणारी
तुझी ती बावरी नजर.
सारे जसेच्या तसे आठवते
अन् तो खट्याळ
पहिला पाऊस
मी माझ्या मनात साठवते.
तुझ्या शब्दांचा वर्षाव जसा,
फूलवेलीचा सुगंधी बहर.
तुझ्या प्रीत वचनांचा आवेग जणु
अवखळ वाऱ्याचा कहर.
तुझा शब्द नि शब्द मनात गोठवते
अन तो आरक्त
पहिला पाऊस
मी माझ्या मनात साठवते.
तुझ्या नजरेतल्या ओल्या
अभिषेकाची सतंतधार
धुवांधार बरसणाऱ्या तुझ्या
उत्कट भावनांचा रेशिमवार.
n> माझ्या रक्ताचा थेंबन थेंब गोठवते अन तो अधिर पहिला पाऊस मी माझ्या मनात साठवते. एखादया कातरवेळी नको असतानाही येतेच सर. तुझ्या अस्तित्वाच्या आभासाचा गारवा लेवुन. आठवणींचा कानाकोपरा पेटवते अन् तो चिंब पहिला पाऊस मी माझ्या मनात साठवते हा पहिला पाऊस मूक साक्षीदार तुझ्या माझ्या अवीट मधाळ आठवणितल्या क्षण थेंबाचा, तुझ्या विरहात होरपळणाऱ्या विरहिणी सरींचा. हा पहिला पाऊस. हा पहिला पाऊस.