शहारा
शहारा
बेधुंद पावसाचे
ओले चिंब थेंब
सुटलेल्या वाऱ्याचा
अल्लड नेम
अश्या चिंबवेळी
तु नाही आठवलास
तर नवलच
तुझ्या नजरेत
विरघळणारी मी
माझ्या नजरेत
रुजू पहाणारा तू
भिजलेल्या मातीचा
मादक गंध
तुझ्या आठवणीत
जगण्याचा माझा
जगावेगळा छंद
हा पाऊस,हा गंध,हा छंद
हा तर एक बहाणा आहे
मी तशी निरागसच रे
खरा गुन्हेगार तर
तुझ्या उल्लेखाने ही
अंगावर उठणारा
हा शहारा आहे

