ब्रेक अप म्हणजे काय असत
ब्रेक अप म्हणजे काय असत
ज्याला मराठीत आपण प्रेमभंग म्हणत असतो
नुसतेच जुळलेले ऋणानुबंध तोडणं असत
की ते कधी जुळलेच नाही,हे उमगन असत
ब्रेक अप म्हणजे काय असत
कुणाचा तरी निरर्थक हट्ट असतो
की दोघांनी मिळून घेतलेला
कठोर निर्णय असतो
की त्रास सहन करायला जमत नाही
असा तो क्षण असतो
पुन्हा एकदा नव्याने जगण्याची बारी असते
की आठवणींवर जगण्याची तयारी असते
की स्पंदनातुनी न दुरावणार नाव असत
ब्रेक अप म्हणजे काय असत

