तुझ्या येण्याने
तुझ्या येण्याने
1 min
27.5K
मदन गन्ध वाऱ्यात मिसळला
प्रणय उमंग अंगात उसळला
दाटल्या कंठाला पाझर फुटला
हळुवार क्षण हे कोमल झाले....तुझ्या येण्याने
नंदादीप उजळले तुझ्या येण्याने
स्पदन तरंग दरवळले
सप्तरंगात विरघळले
आतुरलेले मन हरवले
हळुवार क्षण हे आतुर झाले ...तुझ्या येण्याने
आकाशी शीतल चांदणे अवतरले तुझ्या येण्याने
उजळली कांति कांचणी
लावण्य भरती लोचनी
एका एकांत क्षणी येता जवळ सजने
भाव हळुवार झाले....तुझ्या येण्याने
सप्तसुर नभी विसावले तुझ्या येण्याने
