STORYMIRROR

Prachi Surve

Romance

4  

Prachi Surve

Romance

दिवस वेड्या स्वप्नांचे

दिवस वेड्या स्वप्नांचे

1 min
28.7K


दिवस निघून गेले ते

वेडे स्वप्न पहायचे

एकदाच होणारी नजरानजर

आणि प्रेम व्हायचे


भरुनी रंग पंखात

फुलपाखरू उडायचे

गंध होऊनि फुलांचा

पाकळ्यात दडायचे


विखरलेल्या शब्दांना

एक सुरात बांधणे

दिवसाही पडावे जसे

आकाशात चांदणे


भावनांच्या वाहत्या प्रवाहात

वाहायचे

दिवस निघून गेले ते

वेडे स्वप्न पहायचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance