तिचे लावण्य
तिचे लावण्य
कालची ती रात्र
चिंब भिजली होती
अन् त्याच रात्री
ती मला भेटली होती
तिच्या त्या केसांना स्पर्श करण्या
थेंब किती आतुरले होते
ओठही त्यांचा स्पर्श होता
किती लाजले होते
तिचं लावण्य असंच होतं
प्रत्येकाला सुखावणारं
कितीही दूर गेलं तरी
तिची एक मिठी मागणारं
त्या रात्री ती अशी भिजली
भिजून ती दिसत जशी बिजली होती
पाहून तिचे ते लावण्य
खरी बिजली आभाळातच थिजली होती
न राहवून तिला म्हटलं
तू मखमल त्या फुलांची
तू बहर तो लावण्याचा
तुला उपमा देऊ कशाची
मी अर्थ लावू कशाचा
हे ऐकून मिटून घेतले तिने लोचना
मुखी दाटली नभाची नि
लीमा
मिटले तरी मिटेना नयनांतील प्रभा
हरवून तिच्या नेत्रांत मी असा अविचल उभा
खरोखरच त्या रात्री चंद्र चांदणी
उतरले तिच्या चेहर्यात होते
ओठांत बरसला वरूण
अन् आकाश लोपले तिच्या डोळ्यंत होते
त्या रात्रीच्या स्मृतींची पाने पुन्हा आठवू लागली
डोळ्यांत माझ्या वरूणाची सर दाटली
सुगंधी तिचा स्पर्श आठवला असा
बेधूंद तिच्या मिठीत मी हरवलो जसा
त्या रात्रीत तिचे वर्णन करणारे
सारे शब्द हे या कवितेत मांडले
मांडले ते शब्द नव्हते
होते परि शब्दांत लावण्य ना मांडले
मांडले ते लावण्य कसले
मांडण्या लावण्य सारे संदर्भ फसले संदर्भात सारे शब्द तुटले
तुटले तरी लावण्य मांडण्या मला शब्द ना सुचले...