STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance Abstract Others

2  

Shekhar Chorghe

Romance Abstract Others

एक भ्रमर

एक भ्रमर

1 min
3.0K


आजच्या या मंद रात्री 

रातराणी फुलती आहे 

चंद्रालाही लाजवेल अशी 

नवी चांदणी खुलते आहे 

या लाघववेळी रातराणीचा 

मंद सुगंध विरतो आहे 

या गंधाच्या नशेत बुडण्या 

एक भ्रमर फिरतो आहे 

एक भ्रमर तो नशेत बुडण्या 

गंधालाही विसरून जातो 

कैफ चढता तिच्या नशेचा 

स्वतःलाही हरवून येतो 

त्या रात्री धुंदवेळी 

तिच्या कवितेची नशा त्या भ्रमरावर चढली होती 

अन् रेखण्या तो कवितेचा कैफ 

ती सारी रात्र सरली होती 

भ्रमराच्या त्या इवल्या काव्यात 

तिचं सारं अस्तित्व रेखलं होतं 

मात्र रेखताना तिचं लावण्य 

त्या भ्रमराचं काव्य अपूरं पडलं होतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance