STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

1  

Shekhar Chorghe

Romance

पाऊस

पाऊस

1 min
3.0K


या कोसळणार्या पावसात 

तू एकदाच चिंब भिजून बघ 

न कळला या 'शेखर्याचा' साज जरी

त्याला मिठीत घेऊन बघ 

तुझ्या मिठीतला पाऊस 

तू अता मोकळा कर 

मला घे जवळ तुझ्या अन्

सार्या वादळांना शांत कर...

      

मनातील कल्लोळ माझ्या 

नव्हता कधीच थांबणारा 

थांबेल कसा तो शब्दांनी 

तुझी एक मिठी मागणारा 

आभाळ भरून येतं 

अशावेळी आणखी काय हवं 

तू पावसात भिजायला आतूर 

अन् मी तुझ्यात भिजायला हवं...

       

तुझ्या ओठांचं चुंबन घेताना 

ग्रीष्माच्या पावसाची आठवण होते

तुझी स्पंदनं ऐकू येतात मला अन् 

सारं काळीज क्षितीजावर स्वार होते

       शेखर... 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance