STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

2  

Shekhar Chorghe

Romance

भेटशील का?

भेटशील का?

1 min
3.3K


सांग ना 

आज भेटायचं का आपण?

थोडं मी बोलेल थोडं तू ऐकशील 

थोडं तू बोल मी सारं ऐकेन 

यामुळे काय होईल 

जे काही मनात दडलंय 

ते ओठांवर तरी येईल 

भले ते खोटं का असेना 

पण बोलू आपण 

हरवायचं नाही एकमेकांत अता 

कारण निरोप घेताना 

अश्रू तरी येणार नाहीत बाहेर 

अन् मीही तुला म्हणणार नाही 

तू नको येऊस कधी आसवांच्या रूपात बाहेर 

मला प्रश्न पडतो सावरू कुणाला 

सारं कसं सोपं होऊन जाईन 

दोघेही थोडं थोडं खोटे बोललो तरीही 

चालू थोडं त्या नदीच्या काठानं 

जिथं अजूनही तुझं अस्तित्व जाणवतं मला 

रोज मला भास होतो 

जाणवतं 

चालायचं होतं तुझ्या सोबत काही काळ 

पण काळच थांबला तू गेल्यापासून 

याच काळाला थोडं पुढे सरकवायचंय 

म्हणून तुला भेटायचंय 

भेटशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance