माझ्याजवळ बस
माझ्याजवळ बस
माझ्या जवळ बस जरा बरे वाटते
जगण्यात आनंद आहे, हे खरे वाटते
अंधारी रात ही ,मज खायला उठते
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते
आठवणीचे तुझ्या, मनी काहुर दाटते
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते
शिशिर यातना सोसुन, वसंत पालवी फुटते
माझ्या जवळ बस ,जरा बरे वाटते
तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते
माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते
झाली किती दैना, दुःखाने आभाळ फाटते
माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते
सोसुन यातना झळा, भाकरीचे शिखर गाठते
माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते
उफाळून येता आठवणी, मनाचे पंख छाटते
माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते

