नभ दाटून आले
नभ दाटून आले
1 min
6
*विषय-नभ आले दाटून*
नभ आले दाटून कसे
सुर्य टाकला झाकून
पाऊस येण्याची आशा
किरणे पहाती वाकुन
1
नभ आले दाटून कसे
सुटला थंडगार वारा
ढग खेळती शिवाशिवी
अंगावर पाडतील धारा
2
नभ आले दाटून कसे
विजा नाचती थुईथुई
रिमझिम पावसाने
केली थंडगार भुई
3
नभ आले दाटून कसे
झाला गडगडाट सुरू
बी बियाण्यांची सावड
पेरणी दोघांमध्ये करू
4
नभ आले दाटून कसे
दाटी झाली ही ढगांची
हिरवे होतील शेतसारे
कृपा भिजवित्या मेघांची 5
दुर्गा देशमुख
