STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

4  

Durga Deshmukh

Others

भेटी लागे जीवा

भेटी लागे जीवा

1 min
14

 *साहित्य प्रकार - अभंग लेखन*
 ओढ लावी जीवा
 ओढ लागे जीवा | दर्शनाची आस|
सुटेल का फास.|संसाराचा ||1

 जीव तळमळे | होई कासावीस |
सर्वञ हा भास | विठ्ठलाचा ||2

 तुच माझी माय | तुच माझा पिता|
चरणाशी माथा | राञंदिन ||3

 जीव हा व्याकुळ| करण्यास वारी|
महिमाच न्यारी. |पंढरीची || 4

 संताच्या संगती | भेटती माऊली|
होऊन सावली| विठ्ठलाची ||5

 ज्ञानदेव केली| वारी सुरूवात |
अभंगाची साथ | तुकारामा ||6

 वैष्णवांचा मेळा |वाळवंटी नाचे |
विठ्ठल ही हासे |मनोमन || 7

 पुंडलिक भक्त | मातापिता सेवा |
जागा दिली देवा |चंद्रभागा ||8

 विठ्ठल महिमा | गाऊ किती गोड |
नाही त्याला तोड |.संसारात ||9

 दुर्गा देशमुख परभणी


Rate this content
Log in