स्वराज्य जननी
स्वराज्य जननी


╔═══ஜ۩۞۩ஜ══╗
*1) हिंदवी स्वराज्य जननी*
जिजाऊ माझी तलवारीची धार
तिने केले स्वराज्य साकार!! धृ!!
लखुजी जाधव यांची शिकवण
राणी म्हाळसाबाईचे संगोपन
भालाफेक खेळ तिचे
चालवी दांडपट्टा अन् होई घोडेस्वार!! 1
जिजाबाई गुणवान झाली
भोसल्यांच्या ती ध्यानी आली
मालोजी भोसल्यांची सुन
होईल आता जनतेचा उद्धार!! २
नात्यांना भावनांना बाजूला सारले
खंबीरपणे प्रसंग तारले
कर्तव्यापुढे नातेसंबंध तोडले
सुडाच्या भावनेचे पचवले किती प्रहार!! ३
सुर्यास्ताच्या किरणे सोनेरी
शिवनेरीच्या गडावर पसरली
आकाशात विज लकाकली
जिजाऊ पोटी जन्मले शुर!! 4
p>
महाभारत आणि रामायण कथा
जिजाऊ सांगु लागल्या व्यथा
शिवबाचे वाढु लागले ज्ञान
जिजाऊ होत्या आई आणि गुरुवर!! 5
निजाम आदिल मुघलांच्या स्वा-या
जिजाऊवर पडल्या जबाबदाऱ्या
स्थानिक लोकांना देऊन वचन
चालविला पुण्यात सोन्याचा नांगर!! 6
शिवाजीच्या शिक्षणाचे मोल फार
राजकारणाचे धडे दिले सदरेवर
विवेकी आणि विद्रोही शिवकणीचा वार
समता आणि न्यायाचा केला पुरस्कार!! 7
शौर्य, दुरदृष्टी आणि राज्यकारभार
पुण्याच्या जहागीरीला केल जबाबदार
कसबापेठ गणपती केवरेश्वर मंदिर
तांबडी जोगेश्वरी मंदिराचा केला जिर्णोद्धार!! 8
दुर्गा प्रल्हादराव देशमुख
परभणी