कुठे आले रे आभाळ
कुठे आले रे आभाळ
1 min
11
कुठे आले रे आभाळ भरून कुठे गरजती ढग कशी सांगु सख्या माझ्या जीवाची रे तगमग कुठे पडले चार थेंब कुठे ओघळ गालावर येण्याची आशा दाखवून कशी नाचविती तालावर कुठे कोरड पडली कुठे थेंब डोळ्यात आटला तुझ्या येण्याच्या आशेने पाझर उरात फुटला कुठे पडल्या काळजाला भेगा कुठे दिसे हिरवळ तहानलेली मैना माझी नाही तिची वरदळ असा कसा रे तु पाऊस तुला नाही का रे मन वेळी अवेळी भिजवितो तुझ्या आठवणींचे क्षण दि
