STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

4  

Durga Deshmukh

Others

परभणी माझी छान

परभणी माझी छान

1 min
6

परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान तालुके मिळुन नऊ त्याचे महत्व समजून घेऊ हरवुन जाईल भान ( धृ) पुर्णा रेल्वे जंशन पहाणं कढी वड्याच्या तिथेच मान पुरूप गंगेत तिथेच नहान गंगाजी बापुचे वास्तव्य स्थान गाड्या मिळण्याचे एकमेव ठिकाण 6 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान सेलु शिक्षणाचे माहेरघर नोकरी मिळाली घरोघर सेलुची जगभर चर्चा झाली वालुरची हेलीकस उद्याला आली पोस्टाच्या तिकीटावर मिळाला मान 7 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान येलदरी धरणं जिंतूरचा आरसा चारठाणा गाव ऐतिहासिक वारसा चारूदत्त राजाची चारूक्षेत्र नगर महादेवाचे 360 मंदीर स्वातंत्र लढ्यात चारठाणचे बलिदान 8 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान गंगाखेडची गोदामाई किनारी बसली जनाबाई तिथले राजे राजवाडे महान कलम तिथली छान दक्षिण काशीत मोक्षधाम 1 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान पाथरी जन्मस्थान साई श्रद्धा सबुरी एक माई पार्थपुर हे जुने नाव पांडवांच्या पदस्पर्शाने पावन गाव सबका मालीक एक भजन 3 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान मानवतचे कापड बाई हातमागावर विणले जाई मुख्य ठिकाण बाजार पेठ तिथे सगळीच आहे नवलाई तिथे उत्कृष्ट होते विणकाम 4 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान पालमची महिमा न्यारी गोदावरीने घातली फेरी मोतीराम महाराज वारी आहे ती धाकटी पंढरी फे-यात बसले जांभुळ बन 5 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान परभणीचे पारदेश्वर लिंग अंधश्रद्धेचे फोडले भिंग तुराबुल हक्क दर्गा महान सर्वधर्माचे एक ठिकाण नवसाचा पावतो समान 8 परभणी माझी छान गाऊ तिचे गुणगान


Rate this content
Log in