शंभुराजे
शंभुराजे
*विषय शंभूराजे* *काव्यप्रकार अभंग* सईबाई पोटी| संभाजीचा जन्म ||गड किल्ले धन्य |पुरंदर || आईला पोरके|लहान हे बाळ ||धाराऊ सांभाळ |करीतसे || भाषा विशारद| देखणे व शुर ||मोठे धुरंधर|विचारात || आग्र्याची मोहिम|वय वर्षे नऊ ||यौवनाला दावु|गनिमित || आग्रा कैदेतून|निसटले दोघे ||पाहुणे हे उभे| मथुरेत || राजमुद्रा शंभु|तळपे तेजाने ||आकाशा प्रमाणे|छत्रछाया || जेष्ठ साधुसंत|ते|आदरभाव ||पुत्र नामदेव|दानपत्र || संत तुकाराम| पुत्र महादोबा ||वाढवती शोभा| छत्रपती || मौनीबाबा धन्य|पालखीस भोई ||वाजंत्रीची सोयी|पाटगाव || चाफळची यात्रा| होऊनही भंग ||सांगे यथासांग|आज्ञापत्र || मुघलांची इच्छा|नाशिक हो जिल्हा|| रामशेज किल्ला |मिळविण || संभाजी नेतृत्व|मराठ्यांची इच्छा ||पुरविला पिच्छा| मुघलांचा || जंजि-याचा सिद्दी| पोर्तुगीज गोवा|| मोहीम ही छावा| जोरदार || चिक्कदेवराय|भरला हो घडा ||शिकविती धडा| शंभुराजे || संगमेश्वर हो| बैठक ठिकाण ||मुकरर्बखान|सांगीतले || घेऊन फिरले |बहादुर गड ||धर्मविरगड|संभाजीस || असामान्य लढा|सैन्याशी धैर्याने|| गाजवी शौर्याने| रणांगण|| तो बुधभुषन|ग्रंथ राजनिती ||भाषा व संस्कृती|आळविली || आव्हान पेलुन| झाला धर्मवीर ||मृत्युला अमर| केलेत्याने|| संभाजी महाराज|चरित्र महान ||स्वधर्मभिमान|जाणतसे || नऊ वर्षे फक्त|जिंकून लढाया ||झेंडा हा गाडाया| स्वराज्याचा|| पुणे जिल्हा वढु|सिंहाचा हो छावा||घेतसे विसावा| भिमातीरी || सौ दुर्गा देशमुख. परभणी
