STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

सखी

सखी

1 min
28


गागालगा लगा गागालगा लगा


बागेतली फुले उधळून जा सखी

प्रेमात एकदा भेटून जा सखी


उजळून टाक माझ्या जीवनास तू

रात्रीस चांदणे होऊन जा सखी


काढून काळजाला दावतो तुला

तू चेहरा तुझा पाहून जा सखी


संपेल वेळ केव्हा कोण जाणतो

शत्रुत्व कालचे मिटवून जा सखी


बांधास आसवांच्या फोडलेस तू

मौनातल्या व्यथा बोलून जा सखी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance